प्रतिनिधिक फोटो (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यातून संपुर्ण देशाला बाहेर काढण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरु आहेत. सर्व शासकीय यंत्रणा जोरदार कामाला लागली असून लोकांना वारंवार खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. अशातच कोरोना ग्रस्तांवर योग्य ते उपचार करण्यात यावे यासाठी नौदलही (Navy) सज्ज झाले आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी गरज भासल्यास मुंबईतील पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाचा चमूचा वापर करण्यात येणार आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, येथे नौदलाने विलगीकरणाची सोय केली आहे. मात्र सरकारकडून सूचना आल्यास येथे Quarantine लोकांवर उपचार करण्यात येईल.

सध्या संपूर्ण देश एका मोठ्या आजाराशी लढा देत आहे. या लढ्यात सुज्ञ नागरिकांनी घरी बसणे असा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे. त्याचबरोबर संशयित रुग्णांनी तर Quarantine चा सल्ला देण्यात येत आहे. अशा वेळी या लोकांच्या सेवेसाठी नौदलासाकडून विशेष सेवा दिली जाणार आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus in India: भारत देशात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 873; तर कोरोनाचे एकूण 19 बळी

पश्चिम कमांडचे मुंबईत 'आयएनएचएस अश्विनी' हे अद्ययावत रुग्णालय आहे. वास्तवात करोना हा नवा आजार असल्याने या रुग्णालयातही करोनावर उपचार करणारे तज्ज्ञ सध्या नाहीत. त्याबाबत नौदलाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारकडे कोरोनाचा सामना करण्याची उत्तम सोय आहे. मात्र त्यात जर त्यांना अधिक मदत हवी असेल तर नौदल सज्ज आहे हेच यावरुन दिसत आहे.

राज्यात आज कोरोना व्हायरस (Coronavirus)  बाधित नवे 6 रुग्ण आढळले. त्यातील 5 मुंबई (Mumbai) शहरातील आहेत तर, एक नागपूर (Nagpur) येथील आहे. नव्या रुग्णांची भर पडल्यानंर राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 159 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Ministry) ही माहिती दिली. कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या 834 इतकी आहे.