नायर हॉस्पिटलमधील 26 वर्षीय शिकाऊ डॉक्टर पायल तडवीच्या (Dr.Payal Tadvi) कथित रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रात सारेच सुन्न झाले होते. याप्रकरणी पायलला त्रास देणार्या भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) तीन सिनियर डॉक्टर्सना मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. आज सुनावणीदरम्यान त्यांचा जामीन नामंजूर करत तिघींनाही 21 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कुटुंबाला सरकार कडून 10 लाखाची मदत जाहीर
ANI Tweet
Medical Student Payal Tadvi suicide case: All the three accused in the case have been sent to judicial custody till June 21.
— ANI (@ANI) June 10, 2019
डॉ. पायल तडवीची केस सध्या गुन्हे शाखा विभगाकडे देण्यात आली आहे. जातीवाचक शेरेबाजीला वैतागून पायलने आत्महत्या केली असा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. नुकतीच National Commission for Scheduled Tribes (NCST)ची टीमने मुंबई पोलिसांच्या टीमची भेट घेत या प्रकरणाचा तपास वेगवान करत निकाल लावावा असे सांगितले आहे.