BMC Election 2022: जयंत पाटील यांचे महत्त्वपूर्ण विधान, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी होण्याची शक्यता
BMC, Jayant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका निवडणूक 2022 (Mumbai Municipal Election 2020) मध्ये खेचून घ्यायचीच, असा चंग बाधून भारतीय जनता पक्ष (BJP) कामाला लागला आहे. दरम्यान, भाजपच्या मिशन बीएमसी 2020 हाणून पाडण्याच्या दृष्टीने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मुंबई महापालिका निवडणूक 2020 ला अद्याप वेळ आहे. परंतू, आम्ही महाविकासआघाडीत एकत्र आहोत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढण्यावर विचार करतील.

मुंबई शहरातील भाजपचे स्थान कमी होत आहे. त्यामुळे ते आतापासूनच तयारीला लागले आहेत. मागच्या वेळी आपली लढाई शिवसेनेसोबत आहे, असे दाखवत भाजपने महापालिकेतील संख्याबळ वाढवले. परंतू, आता मुंबईकर भाजपवर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळेच ते आपल्या पक्ष प्रभावीपणे वाढविण्याबाबत विचार करत असल्याची टीकाही पाटील यांनी भाजपवर केली. (हेही वाचा, BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होणार का? विरोधी पक्षनेत्याने दिले हे उत्तर)

दरम्यान, पत्रकारांनी सरकारच्या निधीवाटपाबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, निधी वाटप हे सर्वांना सारखेच होत असते. कोणाकडे दुर्लक्ष होत असेल, असे मला वाटत नाही. मुळात निधीच कमी आहे. त्यामुळे तीजोरीत सध्या पैशांची कमी आहे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारमध्ये निधी वाटप करताना दुजाभाव होत आहे. काँग्रेसचे मंत्री आणि महापालिकांना निधी दिला जात नसल्याची टीका उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नुकतीच केली होती. त्यामुळे जयंत पाटील काय बोलतात याबाबत उत्सुकता होती. .