BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होणार का? विरोधी पक्षनेत्याने दिले हे उत्तर
भाजप कार्यकारिणीची एक बैठकही मुंबईत पार पडली. या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीस (BMC Election 2022) अद्याप बराच अवधी आहे. ही निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. परंतू, तोपर्यंतच भारतीय जनता पक्ष (BJP) निवडणुकीच्या कामला लागला आहे. त्यामुळे इतरही राजकीय पक्षांनी मुंबई महापालिका निवडणूक 2022 बाबात आतापासूनच विचार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आगामी काळात राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) या पक्षासोबत भाजप युती (BJP-MNS Alliance) करेन काय? असे विचारले असता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठोस उत्तर देणे ठाळले. परंतू, त्यांनी काही संकेत मात्र जरुर दिले.
बीएमसी निवडणूक 2022 मध्ये मनसे-भाजप युती होणार का? याबाबत विचारले असता प्रविण दरेकर यांनी सांगितले की, सध्या भाचप इतर कोणताही विचार करत नाही. सध्या भाजप केवळ स्वबळाचा विचार करते आहे. त्यामुळे सध्या तरी आमचा तसा कोणता विचार नाही. परंतू, निवडणुकांच्या वेळी त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगत काही संकेत मात्र दरेकर यांनी जरुर दिले. (हेही वाचा, Shiv Sena on Bjp: भाजपतील उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडील- शिवसेना)
मुंबई महापालिका निवडणूक 2022 डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाने आतापासूनच हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकारिणीची एक बैठकही मुंबईत पार पडली. या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांच्या विधानानंतर शिवसेना नेतेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईवर सत्ता मिळवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. कित्येक जण आले आणि गेले परंतू भगव्याला हात घालण्याची कोणीही हिंमत केली नाही. मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता राहील असे शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटले आहे. तर खरा भगवा कुणाचा हे मुंबईची जनताच दाखवून देईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2020 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

