भिवंडी येथील जंगलात (Bhiwandi Forest) एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. मृत व्यक्ती हा मुंबई महापालिकेत (BMC) वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात दोन संशयीत तरुणांना अटक करण्या आली आहे. ही हत्या समलैंगिक संबंधातून (Gay Relationship) घडल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. संशयीत आरोपी रेल्वे आणि प्राप्तिकर खात्यामध्ये नोकरीला आहेत.
घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, आपल्या घरातील एक 45 वर्षांची एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार नागपाडा पोलिसांकडे 28 ऑगस्टला प्राप्त झाली होती. ही व्यक्ती मुंबई मलापालिकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. चांगल्या पदावर काम करत असताना या व्यक्तीचे गायब होणे हे कुटुंबीयांसह पोलिसांच्याही मनात शंका निर्माण करणारे होते. त्यामुळे नागपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पत्नीसोबत झालेल्या वादातून हा व्यक्ती घरातून गायब झाला असावा असा पोलिसांना सुरुवातीला संशय होता. परंतू, पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे फोनवर संपर्क साधला असता तो बंद होता. त्याच्या बँक खात्यावरुनही कोणत्याही प्रकारचे व्यवहार होत नव्हते. त्यामुळे पोलिसांना आता हत्येचा संशय आला.
पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचे फोन रेकॉर्ड तपासले असता त्यावर शेवटचे काही कॉल आढळून आले. या कॉलच्या अधारे पोलिसांनी तपास केला असता हा व्यक्ती इतर दोन व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. हे दोन्ही व्यक्ती एलफिन्स्टन परिसरात राहात असल्याचा तपशीलही पोलिसांना मिळाला. पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच हे दोघे बोलू लागले. या दोघांपैकी एका व्यक्तीने मान्य केले की त्याचे आणि हत्या झालेल्या व्यक्तीचे समलैंगिक संबंध होते. (हेही वाचा, समलैंगिक कर्मचाऱ्यांसाठी Tata Steel ने उचलले मोठे पाऊल; मागवली जोडीदाराची माहिती, मिळणार सर्व सुविधा)
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले की, संबंधित तरुण आणि हत्या झालेला व्यक्ती यांची ओळख समाजमाध्यमांतून झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि पुढे समलिंगी संबंधात झाले. पुढे या तरुणाच्याघरच्यांनी त्याचे लग्न करण्याचे ठरवले. त्यामुळे या तरुणाने समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला. परंतू, पालिकेत कामाला असलेला तो व्यक्ती या तरुणाची पाठ सोडायला तयार नव्हता. समलैंगिक सबंधांसाठी तो वारंवार आग्रह धरत होता. अखेर या अग्रहाला कंटाळून या तरुणाने आणि त्याच्या मित्राने कट आखला. दारुपार्टी असल्याचे कारण सांगत त्याला बोलवून घेतले आणि धारधार शस्त्रांनी त्याची हत्या केली. नंतर आगोदरच खणून ठेवलेल्या भिवंडी येथील जगलातील खड्ड्यात त्याला पुरले. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.