Mumbai Monsoon Update 2019: बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये 2000 प्रवासी अडकले; NDRF चे बचावकार्य अद्याप सुरू
Representational Image (Photo Credits: PTI)

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे स्थानकांमध्ये पाणी साचल्याची माहिती हाती येत आहे.यामुळे लोकल गाड्यांहसह लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम  होत असल्याचे समजत आहे.  काल रात्रीपासून  बदलापूर (Badlapur) ते वांगणी (Vangani) स्थानकामध्ये रेल्वे ट्रकवर 2 फूट इतके पाणी साचल्याने कोल्हापूर -मुंबई (kolhapur-Mumbai) महालक्ष्मी एक्सप्रेसची वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार एक्सप्रेसमध्ये तब्बल 11 तासंपासून  2000 प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांना सुखरूप ठिकाणी पोहचवण्यासाठी आरपीएफ (RPF) एनडीआरएफ (NDRF) ची टीम घटनास्थळी सकाळपासून कार्यरत आहे, तसेच सामाजिक संस्थांना देखील मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत, मध्य रेल्वेने ट्विट करून, बदलापूर ते कर्जत स्थानकादरम्यान लोकलसेवा बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे, तसेच महालक्ष्मी एक्सप्रेससमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे काही फोटो शेअर करून नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे

एकीकडे उल्हास नदीला पूर आल्याने वांगणी परिसरात पाणी साचले आहे तर  दुसरीकडे अंबरनाथ व विठ्ठलवाडी स्थानकात ही पावसामुळे समान परिस्थिती उद्भवली आहे. विठ्ठलवाडी मध्ये नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने सामन्यांना जवळपास गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. या सर्व परिस्थितीचा फटका चाकरमानी मुंबईकरांना बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, मध्य रेल्वेवर कल्याण-सीएसएमटी, सीएसएमटी-कसारा वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे, तर हार्बर मार्गावर लोकल 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.