मान्सून (Mumbai Monsoon) यंदा दमदार बरसतो आहे. राज्यातही आणि राजधानी मुंबई शहरातही. संथगतीने सुरू झालेला मुंबईचा पाऊस (Mumbai Rains) आता चांगलाच वेग पकडतो आहे. पुढील काही दिवस पर्जन्यमान असेच राहण्याचा हवामान अंदाज (Weather Forecast) आहे. पावसाने विद्यमान आठवड्यात दमदार हजेरी लावल्याने शहर आणि उपनगरांमध्ये विक्रमी टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत शहराने 1,000 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला आहे. आयएमडी (IMD) ने म्हटले आहे की, ताज्या आकडेवारीनुसार, कुलाबा स्टेशनवर 1,074.6 मिमी आणि सांताक्रूझ स्टेशनवर 1,089.21 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आनंदाची बातमी अशी की, वरुणराजा मनसोक्त बरसत असल्याने मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्येही पाण्याचा साठा वाढला आहे.
अलीकडील पाऊस आणि अंदाज
गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 58 मिमी, तर सांताक्रूझमध्ये 38.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर-पश्चिम मान्सून प्रवाह मजबूत झाल्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान अंदाज अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे. (हेही वाचा, Ratnagiri Rain Update: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प; रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी)
जलाशयातील पाणीसाठ्यात दिलासादायक वाढ
मुंबईचा पाऊस शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसाठी लाभदायी ठरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणआर्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. एकाच दिवसात एकूण पाणीसाठ्यात 4.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 14 जुलै रोजी सकाळी 6:00 वाजेपर्यंत, मुंबईतील सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा 4,30,259 दशलक्ष लिटर इतका आहे, जो आवश्यक एकूण साठ्याच्या 29.73 टक्के आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) हवाला देत NDTV प्रॉफिटने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार वन इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील प्रमुख जलाशयांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. (हेही वाचा:Kokan Rain News Update: कोकणात मुसळधार पाऊस,रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट )
एक्स पोस्ट
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.#MumbaiRains#MyBMCUpdate pic.twitter.com/0nctzDvMW1
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2024
मुंबईच्या कोणत्या जलाशयांमध्ये किती वाढ?
- तानसा तलाव: 60.85%
- मोडक सागर: 45.71%
- मध्य वैतरणा: 27.07%
- तुळशी तलाव: 76.54%
- विहार तलाव: 52.08%
वरील सर्व जलाशय मिळून मुंबईला 385 कोटी लिटर पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करतात, ज्यासाठी एकूण 14,47,363 दशलक्ष लिटर इतका उपयुक्त पाणीसाठा आवश्यक आहे.
पुढचे 36 तास अतिमहत्त्वाचे
मुंबईसाठी पुढील 36 तास महत्त्वाचे आहेत. या काळात 200 मिमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या पश्चिम उपनगरांवर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एक्स पोस्ट
🗓️ १४ जुलै २०२४
⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
ओहोटी - सकाळी - १०:४७ वाजता - २.३५ मीटर
🌊 भरती - सायंकाळी - ५:१४ वाजता - ३.५२ मीटर
ओहोटी - रात्री - ११:५७ वाजता - १.६० मीटर
🗓️ 14 July 2024…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2024
समुद्रात भरतीची शक्यता
दरम्यान,, बीएमसीने समुद्रात उंच भरतीचा इशारा दिला आहे, सकाळी 5:22 वाजता 3.17 मीटर आणि संध्याकाळी 5:14 वाजता 3.52 मीटर उंचीच्या लाटा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट जारी
IMD ने अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वार आणि जिल्हानिहाय अलर्ट खालील प्रमाणे
रविवार: मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर.
सोमवार: रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर.
हवामान विभाग आणि मुंबई महापालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा देताना सुरक्षित रहा आणि या पावसाळ्यात हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा, असे अवाहन केले आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडून नका. आपण सुरक्षीत ठिकाणी असल्याची वारंवार खात्री करा. कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मुंबई महापालिकेशी संपर्क साधा असेही पालिकेने म्हटले आहे.