मुंबई: एक्स बॉयफ्रेंडवर 26 वर्षीय अभिनेत्रीचा बलात्कार आणि शारीरिक छळवणूकीचा आरोप
Representational Image (Photo Credits: Facebook)

मुंबईतील मॉडेल-अभिनेत्री हिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड विरोधात बलात्कार आणि शारीरिक छळवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय अभिनेत्री हिची शूटिंगदरम्यान 34 वर्षीय अभिनेता-मॉडेल याच्याशी 2017 मध्ये ओळख झाली. नोएडा येथे राहत असणारा हा अभिनेता अभिनेत्रीला भेटण्यासाठी वारंवार मुंबईत येत असे. तसंच तो विवाहित असल्याचे त्याने पीडित अभिनेत्रीपासून लपवून ठेवले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. (मुंबई: 55 वर्षीय डॉक्टरने 21 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीवर केला बलात्कार, पोलिसांनी ठोठावल्या बेड्या)

त्यानंतर आरोपी अभिनेत्याने पीडित अभिनेत्रीला तिच्या मित्र-मैत्रिणींशी संबंध न ठेवण्यास सांगितले. तसंच कोणत्याही पुरुष अभिनेत्यासोबत काम न करण्याचे बंधन घातले. याला विरोध करताच आरोपी पीडित अभिनेत्रीला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (अभिनेत्री मोना सिंगच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप)

या प्रकरणी भारतीय दंड संहिता 376 (2) (n), 323, 504 आणि 506 या कलमाअंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या मुंबईत नसून आम्ही त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.