अभिनेत्री मोना सिंगच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

अभिनेत्री मोना सिंग (Mona singh) हिचा एक्स बॉयफ्रेंड करण ऑबेरॉय (Karan Oberoi) याला बलात्कार आरोप प्रकरणी अटक करण्यात आली आहे

अभिनेत्री मोना सिंगच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप
Karan Oberoi (Photo Credit): Twitter

‘जस्सी जैसी कोई नहीं’ ह्या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मोना सिंग (Mona singh) हिचा एक्स बॉयफ्रेंड करण ऑबेरॉय (Karan Oberoi) याला बलात्कार आरोप प्रकरणी अटक करण्यात आली आहे. इतकचं नव्हे तर त्या पीडित महिलेचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप करणवर लावण्यात आला आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी करण ऑबेरॉयला अटक केली आहे.

पीडित महिलेने पोलिसांना असे सांगितले की, करणने बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकवत होता. तसेच तिच्याकडून पैसे उकळले असल्याचे तिने ओशिवारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर करणने मला त्याच्या घरी बोलावून तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने कथित रुपात तिला नारळ पाणी प्यायल्या दिल्यानंतर काही वेळाने ती चक्कर येऊन खाली पडली. त्याचवेळी आरोपीने माझ्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. या प्रकरणी करणला अंधेरी कोर्टात हजर केले असून कोर्टाने त्याला ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ज्योतिष महिलेवर टेलिव्हिजन अभिनेत्याने बलात्कार केल्याचा आरोप, एफआयआर दाखल

करण टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने जस्सी जैसी कोई नही, स्वाभिमान, साया, जिंदगी बदल सकता है हादसा या मालिकांमध्ये काम केले आहे. जस्सी जैसी कोई नहीं मध्ये करणने मोना सिंगसोबत काम केले होते. येथूनच दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2019 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).