प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेचे (MNS) कार्यालय 'राजगड' समोर महापालिकांच्या (BMC) फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा करुन देण्यात आली आहे. त्यामुळे मनसेने या प्रकारावर संताप व्यक्त केला असून आज (13 फेब्रुवारी) जी नॉर्थ वॉर्डवर पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे. तसेच महापालिकेच्या निर्णयाला विरोधत करत कार्यालयाच्या परिसरात फेरिवाल्यांना बसण्यास देणार नसल्याची आक्रमक भुमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळेच महापालिका विरुद्ध मनसे असा नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा मनसेने फेरिवाल्यांच्या विरोधात आवाज उठवत त्यांना हकलवून लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता पुन्हा फेरिवाल्यांना महापालिकेने जागा दिल्याने त्याचा विरोध केला आहे.

फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करत महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशनानुसार काम करण्यास सुरुवात केली आहे. फेरिवाल्यांच्या विरोधात लोकांकडून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर सुधारित यादी तयार करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने फेरिवाल्यांना एक बाय एक अशी जागा देत त्यांची रंगरंगोटी करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये दादर, माहिम आणि जी उत्तर विभागातील 14 रस्त्यांना फेरिवाला क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये 1 हजार 485 फेरिवाल्यांना बसण्याची जागा देण्यात आली आहे.(कोल्हापूर महानगरपालीकेत महाविकासआघाडीचा दबदबा; महापौरपदी काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड, भाजपला फक्त 1 मत)

सत्तेस असलेल्या शिवसेनेने मनसेवर कुरघोडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. राजकिय पक्षांना विचारात घेतले नसल्याचा आरोप मनसेने लावला आहे. कासारवाडी ते कोहिनुर स्क्वेअर येथे फेरिवाल्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे राजगडाच्या समोरच आता हे फेरिवाले बसणार आहेत. रहिवाशी भागात फेरिवाल्यांना परवानगी नसल्याचा नियम असुन सु्द्धा मनसेच्या मुख्य कार्यालयासमोर फेरिवाले यांना जागा उपलब्ध करुन दिली आहे. मनसेचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.