Mira Road Murder Case: सरस्वती वैद्य यांचे नेमके काय झाले? मिरा रोड 'लिव्ह इन पार्टनर' हत्या प्रकरणात आरोपी मनोज साने याचा धक्कादायक दावा
Mira Road Murder Case | (File Image)

Mumbai Mira Road Live in Partner Murder Case: मुंबई येथील मिरा रोड (Mira Road) परिसरातील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या सरस्वती वैद्य नामक तरुणीची कथीत हत्या करणाऱ्या आरोपी मनोज साने याने पोलिस चौकशीत धक्कादायक दावा केला आहे. मनोज साने याला अटक करण्यात आली असून, सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस चौकशीदरम्यान मनोज साने याने दिलेल्या माहितीत दावा केला आहे की, त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिने आत्महत्या केली होती. मात्र, तिच्या मृत्यूनंतर आपल्यावर हत्येचा आरोप होईल याची भीती वाटल्याने त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

मनोज साने याने पोलिसांना सांगितले की, मृतदेहाची दूर्गंधी टाळण्यासाठी आपण तिच्या शरीराचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आपण आत्महत्या करायची असाही निर्णय घेतलाहोता असे त्याने पोलिसांना सांगितले. आपण जो निर्णय घेतला आणि कृत्य केले त्याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारे खेद वाटत नसल्याचे मनोज साने याने म्हटल्याचे मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीसांनी म्हटले आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Live-in Relationship and Murder: तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये वाटले; मुंबई येथे 'लिव्ह-इन-रिलेशनशिप' पार्टनरसोबत धक्कादायक कृत्य (Watch Video))

मनोज साने याच्या दाव्याबद्दल पोलिसांना संशय

पोलिसांनी म्हटले आहे की, मृताच्या आत्महत्येच्या आरोपीच्या दाव्याची आम्ही पडताळणी करत आहोत. तपास सुरू असून घरातून सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आरोपीने केलेल्या पीडितेच्या आत्महत्येच्या दाव्याबाबत आम्हाला शंका आहे.

ट्विट

काय आहे प्रकरण?

मुंबई शहरातील मिरा रोड परिसरात 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या झाली आहे. या प्रकरणातील पीडिता सरस्वती वैद्य 32 तर आरोपी मनोज साने 52 वर्षांचा गृहस्थ आहे. मीरा भाईंदर उड्डाणपूलानजिक असलेल्या गीता नगर येथे गीता आकाशदीप नावाच्या सोसायटीत फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये दोघंही प्रदीर्घ काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असत. हत्येचे नेमके कारण पुढे आले नाहीत. पोलीस आरोपी मनोज साने याच्याकडे चौकशी करत आहेत. लवकरच हत्येचे कारणही पुढे येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी मनोज साने याच्यावर नयानगर पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.