महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने त्याचा फटका विविध राज्यांना बसला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangali) येथील नागरिकांचे पावसामुळे हाल झाले आहेत. याचा दूध संकलानवर परिणाम झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक महामार्ग पावसामुळे बंद झाल्याने दूध संकलन होऊ शकले नाही. यामुळे आता उद्या मुंबईकरांना दूध मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसामुळे मुंबई, पुण्याल पुरवल्या जाण्याऱ्या दूधाचे टँकर अडकले आहेत. त्याचसोबत सांगली-कोल्हापूर येथून मुंबईला दररोज 14 लाख लीटर दिले जाते. मात्र या ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाल्याने उद्या मुंबईला दूध मिळणार नाही आहे. मंगळवारच्या रात्रीपासून ते अद्याप कोल्हापूर-सांगली येथून दूधाचा एकही टँकर मुंबईच्या दिशेने आला नाही आहे.(Kolhapur Rains 2019: कोल्हापूर मध्ये पावसाचा कहर; दूध संकलन बंद)
सोमवारी आणि मंगळवार सलग दोन दिवस दूध संकलन न झाल्याने सुमारे 1 ते सव्वा कोटीचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर कोल्हापूर, सांगली भागामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाचा कहर असल्याने पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेतली जात आहे. तसेच एअरलिफ्ट साठी हेलिकॉप्टर सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.