Kolhapur Rains 2019: कोल्हापूर मध्ये पावसाचा कहर; दूध संकलन बंद
Milk (Photo Credits: PixaBay)

Kolhapur Rains Update:  महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्यापासूनच दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोल्हापूर(Kolhapur), सांगली (Sangli) भागामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूरात मागील 30 वर्षांतील विक्रमी पावसामुळे दूध संकलन (Milk Collection) घटले आहे. अनेक महामार्ग बंद झाल्याने दूध संकलन होऊच शकले नाही. परिणामी दूध उत्पादकांना त्याचा फटका बसत असल्याचं समोर आलं आहे. पहा आजच्या पावसाच्या लाईव्ह अपडेट्स 

पावसामुळे दुधाचे मुंबई, पुण्याकडे येणारे टॅंकर अडकून पडले आहेत. कोल्हापूरातील गोकुळ, वारणा यासारखे अनेक लहान - मोठे संघ आज दूध संकलन करूच शकले नाहीत. कोल्हापूरात महापूरामध्ये 97 बंधारे आणि राष्ट्रीय, राज्य महामार्ग बंद झाल्याने दूध संघांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.वारणा दूध संघाचे चार हजार लीटर, स्वाभिमानी दूध संघाचे 1 हजार लीटर दूध संकलन कमी झाले आहे. सोमवारी आणि मंगळवार सलग दोन दिवस दूध संकलन न झाल्याने सुमारे 1 ते सव्वा कोटीचा फटका बसणार आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगली भागामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाचा कहर असल्याने पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेतली जात आहे. तसेच एअरलिफ्ट साठी हेलिकॉप्टर सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.