म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाने 217 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी अर्जदात्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने लॉटरीसाठी घरांवरील मुदतवाढ करण्यात आली आहे. तर आता पर्यंत 46 हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्याचसोबत 22 एप्रिल पर्यंत जवळजवळ 26 हजार लोकांनी अनामत रक्कम भरल्याचे देखील दिसून आले असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.
तर या लॉटरीसाठी आता 24 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या एका घरामागे 122 अर्जांची नोंदणी झाली असून अद्याप एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अर्जदारांची संख्या वाढत चालली आहे.(आचार संहिता लागू झाल्याने म्हाडा लॉटरीची तारीख पुढे ढकलली)
म्हाडाकडून चेंबूर आणि पवई येथील 217 घरांसाठी लॉटरी जाहीर केली. परंतु लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असून 23 एप्रिलची सोडत 2 जून रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी 13 एप्रिल ही अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख असल्याचे सांगितले होते.