म्हाडाने (MHADA) काही दिवासांपूर्वी घरांसाठी लॉटरीच्या कधी निघणार याबाबत तारीख जाहीर केली होती. तसेच येत्या 21 एप्रिल ही तारीख म्हाडाने दिली होती. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा आयोगाने स्पष्ट केल्यानंतर आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता म्हाडाने लॉटरीची तारीख पुढे ढकलली असल्याचे सांगितले आहे. घरांच्या लॉटरी आता 23 मे नंतर जाहीर केली जाणार आहे.
मुंबईत 217 घरे आणि कोकणात 276 दुकानांच्या लॉटरीची जाहिरात म्हाडाने 3 मार्च रोजी जाहीर केली होती. तर अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी चेंबूर येथे शेल टॉवरमधील इमारत क्रमांक 2,23,37 येथे 170 घरे आहेत. तसेच घराचे क्षेत्रफळ हे 348 ते 381 चौफूट असणार आहे. तर म्हाडाच्या या घरांची किंमत 31 लाख ते 34 लाख पर्यंत असणार आहे. त्याचसोबत मध्यम उत्पन्न गटासाठी एक घर राखीव असून त्याची किंमत जवळजवळ 39 लाख रुपये आहे. पवई येथेसुद्धा म्हाडाची 46 घरे असून त्यांची किंमत 55 लाख रुपयापर्यंत ठेवण्यात आली आहे.(हेही वाचा-म्हाडा लवकरच महाराष्ट्रात 11 हजार घरांसाठी लॉटरी काढणार)
म्हाडाच्या घराच्या लॉटरीसाठी 7 मार्चपासून सुरुवात झाली होती. तसेच घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु आचार संहिता लागू झाल्याने म्हाडा लॉटरीच्या घरांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.