मुंबई मेट्रो सेवन ए (7-A) लाईनवरुन धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे (Mumbai Metro Breakdown) त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला. ही घटना मंगळवारी (16 जानेवारी 2023) सकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार दहिसर ते कांदिवली दरम्यान मेट्रो सेवा (Dahisar and Kandivali Metro Service) ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाड दुर करुन सेवा पुर्ववत करण्याचे काम मेट्रो प्रशासनाकडून सुरु आहे. दरम्यान, उंच पुलावरुन धावणारी ही मेट्रो जागीच थांबल्यामुळे प्रवाशांनी ट्रॅकवर उतरणे पसंत केले. मेट्रो ट्रॅकवरुन चालत निघालेल्या प्रवाशांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
गुंदवली ते अंधेरी दरम्यान मेट्रो सेवा सुरु
दहिसर कांदिवली दरम्यान मुंबई मेट्रो सेवा ठप्प झाली. दरम्यान, गुंदवली ते अंधेरी दरम्यान मेट्रो सेवा सुरु आहे. प्रवाशांना होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने एका बाजूची सेवा सुरु ठेवळी आहे. तसेच, दुसऱ्या बाजूची सेवाही तांत्रिक अडथले दूर करुन लवकरच दूर करण्यात येणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Navi Mumbai Metro: जवळजवळ 68,000 हून अधिक प्रवाशांनी केला नवी मुंबई मेट्रोने प्रवास; केवळ 5 दिवसांत वाहतूक समस्या झाली कमी)
नेमके काय घडले?
प्राप्त माहितीनुसासर, गिंदवली ते अंधेरी पश्चीम डीएन नगर मेट्रो स्थानकादरम्यान धावणाऱ्या एका मेट्रो ट्रेनला बेरिवली पश्चिमेस असणाऱ्या मंडपेश्वर आणि एक्सर मेट्रो स्टेशनदरम्यान तात्रिक बिघाड निर्माण झाला. ज्यामुळे ट्रेन ट्रॅकवरच थांबली. त्याचा परिणाम होऊन दहिसर ते कांदिवली दरम्यान मेट्रो सेवा ठप्प झाली. (हेही वाचा, Mumbai Metro Line 3 Phase 1: मुंबईकरांना दिलासा! मेट्रो मार्ग 3 चा पहिला टप्पा या वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता)
गुंदवली ते अंधेरी दरम्यान मेट्रो सेवा सुरु
दरम्यान, मंडपेश्वर आणि एकसर मेट्रो स्टेशनदरम्यान तात्रिक बिघाड निर्माण झाला असला तरी गुंतवली ते अंधेरी दरम्यान मेट्रोसेवा सुरु आहे. प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी मेट्रोची एक लाईन सुरु आहे. तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरु आहे.
व्हिडिओ
Probably the First incident where Mumbai Metro got stuck in between and commuter came out on the track near eksar road station. #mumbaimetro @MumbaiMetro01 please clarify whether Metro is working properly or not so we can plan our day accordingly. pic.twitter.com/JWzoiU6ZyI
— SANKET SAVALIYA (@sanket69s) January 16, 2024
प्रवासी मेट्रो ट्रॅकवर
प्राप्त माहितीनुसार, मंडपेश्वर आणि एकसर मेट्रो स्टेशनदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो एकाच ठिकाणी अर्धा-ते पाऊण तास थांबली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरम निर्माण झाले. बराच काळ गाडी एकाच ठिकाणी थांबल्यामुळे प्रवाशांनी ट्रॅकवर उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. ते ट्रॅकवर उतरुन चालू लागले.
मेट्रो ट्रॅकवरुन चालणे धोक्याचे
दरम्यान, मेट्रोचे ट्रॅक हे जमनीलगत नसतात. ते जमीनीपासून काही फूट उंचावर असतात. त्यामुळे मेट्रोचा आणि जमीनीचा तसा थेट संबंध येत नाही. त्यामुळे या ट्रॅकवरुन चालणे प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. मात्र, मेट्रोच्या इतिहासात बहुदा अशी घटना पहिल्यांदाच घडली असावी. ज्यामुळे प्रवाशांना ट्रॅकवर उतरुन चालावे लागले.