Mumbai Local Train (Photo Credits: Instagram)

मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane) आणि नवी मुंबई (Navi Mumbai)  परिसरात आजही हवामान खात्यातर्फे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, याच पार्श्वभूमीवर, दर रविवारी घेण्यात येणार मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वेचा (Harbour Railway) ब्लॉक (Megablock)  रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसात प्रवाशांची पंचाईत होण्यापासून किंचित सुटका मिळेल अशी अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे. मात्र पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) प्रवाशांना आजच्या ब्लॉकमध्ये कोणतीही सूट दिलेली नाही.

आज, मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार होता तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आजचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने एका ट्विट मार्फत याविषयी माहिती दिली आहे.

मध्ये रेल्वे ट्विट

दरम्यान, पश्चिम रेल्वे वर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. या काळात चर्चगेट दिशेकडील लोकल विरार/वसई रोडहून भाईंदर/ बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावर धावतील.