मुंबई शहरात (Mumbai Measles Outbreak) वाढत असलेला गोवर संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे. आज पुन्हा एकदा गोवरचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, एका रुग्णाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरातील गोवर (Measles) संक्रमितांची संख्या 303 पेक्षाही अधिक झाली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार गोवरमूळे मृत्यू झालेल्या आणि त्याची पुष्टी झालेल्या रुग्णांसी संख्या आठ इतकी आहे. तर, संशयित मृतांची संख्या 3 इतकरी आहे.
महापालिकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई शहरात नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील 1,34,833 मुलांना लस टोचली जाणार आहे. त्यांना 1 डिसेंबरपासून 33 आरोग्य केंद्रावर अतिरिक्त मात्रा (विशेष लस मात्रा) प्राप्त होईल. आतापर्यंत 13 आरोग्य केंद्रांमध्ये सहा ते नऊ महिने वयोगटातील एकूण 3,496 मुलांना गोवर लस देण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी नऊ महिन्यांपेक्षा कमी वयोगटातील गोवर प्रकरणे नोंदवली गेली आहेत आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी गोवर संक्रमितांची नोंद होील त्यांना गोवर-रुबेला लसीचा अतिरिक्त डोस देखील दिला जाईल, अशी माहिती या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. (हेही वाचा, Measles Outbreak In Mumbai: गोवर आजाराचा संसर्ग कसा थांबवाल? मुलांना व्हायरल संसर्गापासून रोखण्यासाठी 6 महत्त्वाचे उपाय, घ्या जाणून)
BMC ने आत्तापर्यंत 53,66,144 घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात 4,062 बालकांना पुरळ आणि तापाची लक्षणे आढळून आली आहेत. सोमवारी झालेल्या एका मृत्यूची नोंद शहराच्या पश्चिमेकडील अंधेरी येथे राहणाऱ्या एका वर्षाच्या लसीकरण न झालेल्या मुलीचा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबईत नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील 1,34,833 मुलांना लस टोचली जाणार आहे. त्यांना 1 डिसेंबरपासून 33 आरोग्य केंद्रात अतिरिक्त डोस (विशेष डोस) मिळेल.
दरम्यान, गोवर हा आजार संसर्गजन्य आहे आणि तो प्रामुख्याने लहान मुलांना होतो. हा अजार श्वसन प्रक्रियेत संसर्ग निर्माण करतो. त्यानंतर त्याचा प्रादुर्भाव रुग्णाच्या संपूर्ण शरीरात पसरतो. ज्यामुळे रुग्णाला सर्दी, ताप, थंडी, अंगावर लहान पुरळ आणि श्वसनविकार आदी लक्षणे (Symptoms of Measles) दिसतात. हा आजार पूर्णपणे बरा करता येतो. योग्य लसीकरण आणि उपचारांद्वारे हा आजार बरा करता येऊ शकतो.