महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मंदिरांसोबतच इतर धार्मिक स्थळंदेखील पुढील काही दिवस बंद करण्याचं आवाहन केलं होतं. आता त्याला मुंबईकरांकडून हळूहळू सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान गर्दी टाळण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहिम येथील प्रसिद्ध St. Michael's Church हे 1 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता भाविकांना या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी एकत्र जमता येणार नाही. दरम्यान आजपासून मुंबईत 50% दुकानं बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यानुसार माहिम परिसरात सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी टी. एच. कटारिया मार्ग (दक्षिण बाजू- गंगाविहार हाॅटेल ते शोभा हाॅटेल), लेडी जमशेदजी क्राॅस रोड (दर्गा गल्ली) येथील दुकानं बंद राहतील.
मुंबईसह देशभरात महत्त्वाची धार्मिक स्थळं भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी येथील साई मंदिर, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर ते यंदाची वैष्णवो देवी यात्रा देखील 31 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. Coronavirus: कोरोनामुळे भक्तांना मंदिरात प्रवेश नाही! आता देहूचे तुकोबा तर, आळंदी येथील माऊली मंदिर 31 मार्च पर्यंत राहणार बंद.
ANI Tweet
Mumbai: Mass gatherings suspended at St. Michael's Church in Mahim till 1st April, in view of #Coronavirus. #Maharashtra pic.twitter.com/B0VtQRvGKz
— ANI (@ANI) March 19, 2020
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 आहे तर भारतामध्ये कोरोनाग्रस्त रूग़्ण 166 पर्यंत पोहचले आहे. सध्या कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आंतरराष्ट्रीय दौरे रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाने त्यांच्या 10,12 वी परीक्षा देखील 31 मार्च पर्यंत स्थगित केल्या असून राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.