Mumbai Marathon 2020: कुठे आणि कधी होणार मुंबई मॅरेथॉन? काय असतील विशेष सेवा? जाणून घ्या या रेस ची संपूर्ण माहिती
Representational Image (Photo Credits: PTI)

Mumbai Marathon 2020 Details: मुंबईची सर्वात मोठी मॅरेथॉन शर्यत येत्या रविवारी म्हणजेच 19 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनचे रेसचे डायरेक्टर जोन्स यांनी बुधवारी PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मॅरेथॉनच्या सुधारित मार्ग हा पूर्वीच्या मार्गापेक्षा वेगवान धावपटूंना कमी फ्रिक्शन देण्यास मदत मारेल.

आज, टाटा मुंबई मॅरेथॉन ही जगातील टॉप 10 मॅरेथॉनपैकी एक आहे. या इव्हेंटमध्ये एकूण 6 विभाग असणार आहेत, ते म्हणजे फुल मॅरेथॉन (42.195 किलोमीटर), हाफ मॅरेथॉन (21.097 किलोमीटर), ड्रीम रन (6.6 km किमी), ज्येष्ठ नागरिकांची शर्यत (4.7 किमी), चॅम्पियन्स अपंगत्व श्रेणी (2.1 किमी) आणि नव्यानेच सुरु होणारा 10 किलोमीटर ओपन हा विभाग. दरवर्षी जानेवारीच्या तिसर्‍या रविवारी ही मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्यात येते. यात देशभरातून 46,000 पेक्षा जास्त फिटनेस उत्साही आणि धावपटू या शर्यतीत सहभागी होतात.

ही शर्यत छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) या युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रख्यात रेल्वे स्थानकावरुन सुरु होऊन तिथेच संपते.

एशियन हार्ट इन्स्टिट्यूट (एएचआय) धावपटूंसाठी अत्याधुनिक सुविधा आणि सेवांचे योगदान देत आहे या कार्यक्रमाला वैद्यकीय मदत पुरवणार आहेत. कोणतीही वैद्यकीय आणीबाणी - जखम, डिहायड्रेशन किंवा मार्गावर लांब पल्ल्यामुळे उद्भवणारी इतर कोणतेही वैद्यकीय प्रॉब्लेम्सवर ही संस्था मदत पुरवणार आहे.

Mumbai Marathon 2020: Best Bus सेवांच्या मार्गांमध्ये मोठे बदल; काही ठिकाणी बस सेवा राहणार बंद

स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही बस किंवा रेल्वे सेवांचा वापर करू शकता.

रेल्वे सेवा: पश्चिम रेल्वेने आयोजित केलेल्या विशेष गाड्या - विरारहून चर्चगेटला रात्री 2:20 वाजता सुटणारी पहाटे 4:02 वाजता चर्चगेटला पोहोचेल व बोरीवलीहून पहाटे 3:22 वाजता सुटणारी स्लो ट्रेनचर्चगेटला 4.22 ला पोहोचेल.

शटल बस सेवा: एकूण 60 बसेस धावतील. शटल बस सेवा महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या बाहेर (पश्चिम मार्गाने) व परळ रेल्वे स्थानक (मध्य रेल्वे मार्ग ) - इंडियबुल्स इमारतीजवळ पहाटे 3:00 ते पहाटे 4:30 दरम्यान लव्ह ग्रोव्ह फ्लायओव्हर जवळ स्पर्धकांना सोडेल.