मुंबईतले 'मराठी'पण हरवतेय, 'हिंदी' भाषेचा सर्वत्र बोलबाला
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Mumbai: 'मुंबई मेरी जान' बोलणाऱ्या या मायनगरीत सध्या दिवसागणिक लोकसंख्या वाढत चालली आहे. तसेच विविध प्रांतातील लोक येथे येऊन आपले घर बसविण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे मुंबईत विविध जाती धर्माच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परंतु ऐकीकडे मुंबईची मुख्य मराठी भाषा ही हरवत चालली आहे असे चित्र सध्या दिसून येत आहे. तर दुसरीकडे हिंदी भाषेचा बोलबाला सर्वत्र वाढत चालले आहे.

मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे मातृभाषा असलेल्या जनगणनेचा 2011 मधील अहवाल पाहिल्यास असे लक्षात येते की, हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. तर 2001 पासून ते 2011 पर्यंत हिंदी भाषिकांची संख्या 35.98 लाखांवर जाऊन पोहचली आहे. मात्र मराठी माणसे या मायनगरीत कमी पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत मराठी मातृभाषिकांच्या संख्येच्या आकड्यामध्ये 2.64 टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसून आले आहे. 2001 ते 2011 मध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 44.04 लाख झाली आहे.

त्याचसोबत ठाणे आणि रायगड येथे मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी होऊन हिंदी भाषिकांची संख्या 80 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारचे नियोजनच नाही तर राजकरणही या भागात बदलत चालले आहे. तर स्थानिक यांच्या विरुद्ध परप्रांतीय असा वाद निर्माण झाला आहे.

मुंबईतील मातृभाषिकांची संख्या 2011 नुसार-

मराठी- 44.04 लाख

हिंदी-35.98 लाख

गुजराती-14.28

उर्दू- 14.59