मुंबई: मानखुर्द मधील Containment Area मध्ये भाजी विक्री करत असल्याने महिला आणि पोलिसात जुंपली (Watch Video)
मानखुर्द येथे महिला आणि पोलिसात जुंपली (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैंमान घातले आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. तरीही नागरिक सकाळच्या वेळेस भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचसोबत सरकारने कोरोनाबाधित रुग्ण असलेले परिसर सील केले आहेत. याच पार्श्वभुमीवर आता मुंबईतल्या (Mumbai) मानखुर्द (Mankhurd)  येथे कंन्टेंटमेंड झोन (Containment Area) मध्ये एका महिलेकडून भाजी विक्री केली जात होती. त्यावेळी पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कंन्टेटमेंट परिसरात कोरोना्च्या पार्श्वभुमीवर एका महिलेकडून भाजी विक्री केली जात होती. मात्र या परिसरात भाजी विकण्यास मनाई आहे तरीही नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिसांनी पोहचताच तिची भाजीची गाडी उलटी करुन त्यावरील भाजी खाली फेकली. सदर महिला मी भाजीची गाडी देणार नाही असल्याचे सुद्धा म्हणत होती. तरीही पोलिसांनी तिचे न ऐकता भाजीची गाडी ताब्यात घेतली असुन या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Lockdown च्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक बंदच; 20 एप्रिल पासून 'या' उद्योगांना मिळणार परवानगी- उपमुख्यमंत्री अजित पवार)

दरम्यान, पोलिसांकडून लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात 31 हजार गुन्हांची नोंद विविध राज्यातून करण्यात आली आहे. नागरिकांना वारंवार सांगून सुद्धा घरात न थांबता घराबाहेर पडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यातील नागरिकांसाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचे ही स्पष्ट केले होते.