नोकरीसाठी मुलाखात घेण्याच्या बहाण्याने एका नरधमाने शिक्षित महिलेवर बलात्कार केला आहे. ही धक्कादाक घटना मुंबई (Mumbai) येथील जूहू (Juhu) परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. दरम्यान आरोपीने सोशल मीडियावर तिचे नग्न फोटो व्हायरल करेल, अशी धमकीही दिली होती. यामुळे पीडित महिला पूर्णपणे घाबरली होती. परंतु, पीडित महिलेच्या मैत्रीणींनी तिला स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. यामुळे स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गु्न्हा नोंदवला आहे. साहील सिंह आरोरा असे आरोपीची नाव आहे.
पीडित महिला उच्चशिक्षित असून ती 2 मैत्रीणीसोबत नवी मुंबई येथे राहते. पीडित महिला गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होती. यासाठी या तिने माहीतीसह तिचा फोटो ऑनलाईन जॉब पोर्टल येथे ठेवला होता. 5 दिवसापूर्वी साहिलने या महिलेची ऑनलाईन जॉब पोर्टलवर प्रोफाईल पाहून तिला फोन केला होता. तसेच त्याच्याकडे नोकरी असल्याचे साहिलने सांगितले. त्यानंतर साहिलने महिलेला मुलाखाती देण्यासाठी बोलावून घेतले . परंतु, साहिलने मुलाखात देण्यासाठी महिलेला नोकरीच्या ठिकाणी न बोलवता जुहू येथील एका हॉटेलच्या एका रुममध्ये येण्यास सांगितले. त्यावेळीच साहिलने मुलाखातीच्या बहाण्याने बोलावून या महिलेवर बलात्कार केला. घरी परतल्यानंतर या महिलेने सर्वप्रकार तिच्या मैत्रीणीला सांगितला. त्यानंतर पीडिताच्या मैत्रीणींनी तिला पोलिसात तक्रार करण्याचा योग्य सल्ला दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हे देखील वाचा- मुंबई लोकलमधील फर्स्ट क्लास डब्यातील दरवाज्याच्या बाजूला उभं राहण्यावरुन जुंपली, सहप्रवासाने बोट चावून तोडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला 19 सप्टेंबर रोजी फोन करुन जुहू येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आवश्यक कागदपत्रे घेवून मुलाखातीसाठी येण्यास सांगितले होते. आरोपीने सांगितलेल्या पत्यावर पीडित महिला येऊन पोहचली. त्यावेळी आरोपीने तिला एका आंतरराष्ट्रीय बॅंकेत एचआरच्या पदासाठी जागा असल्याचे सांगितले. या पदासाठी तिला दरमहा 30 हजार पगार मिळणार, असेही सांगितले. नोकरी संदर्भात आरोपीने दिलेल्या माहितीवर पीडित महिला सहमत झाली. परंतु काहीवेळाने आरोपी या महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करु लागला. महिलेने यासाठी नकार देताच त्याने महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न फोटो काढले. साहिलने या महिलेला संपूर्ण एक दिवस हॉटेलच्या रुमवर ठेवून थेट दुसऱ्या दिवशी तिला सोडले. याबदल कोणालाही माहीती दिली तर, तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी आरोपीने या महिलेला दिल. घरी परल्यानंतर महिलेने सर्वप्रकार तिच्या मैत्रीणींना सांगितला. त्यावेळी तिच्या मैत्रीणींनी पोलिसात तक्रार करण्याचे सुचवले. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर कलम 376 आणि 506 कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.