मुंबईत ऑनलाईन दारु मागवणे पडले महागात, व्यक्तीला 68 हजारांचा गंडा
Online liquor delivery fraud (Photo Credits: Pixabay)

अंधेरी येथे राहणाऱ्या एका 61 वर्षीय व्यक्तीने ऑनलाईन दारु खरेदी केली. मात्र त्याला तब्बल 68 हजारांचा गंडा घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्यक्तीने रम आणि बिअर ही जेबी नगर येथील एका दुकानातून ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केली होती. त्याला येथील एका स्थानिक दारुच्या दुकानाचा क्रमांक इंटरनेटवर मिळाला होता. व्यक्तीने फोन केला असता त्याला व्हॉट्सअॅपवरील एक QR कोड स्कॅन करण्यसाठी सांगितले असता त्याने पैसे गमावले आहेत.(COVID 19: मास्क न वापरणाऱ्यांकडून तब्बल 51.46 कोटी दंड वसूल- मुंबई महापालिका)

पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जाणार आहे. तर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना कोणतीही खासगी माहिती किंवा बँक संदर्भातील गोष्टी अज्ञात व्यक्तीला शेअर करु नये असा वारंवार सुचना दिल्या जातात. तसेच बँक सुद्धा ग्राहकांना फसवणूकदारांपासून सावध राहण्यासाठी वेळोवेळी बँक खात्यासंबंधित असलेले पासवर्ड बदलण्यास सांगतात. मात्र व्यक्तीने क्यूरआर कोड स्कॅन केल्याने त्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.(Remdesivir Injection Black Marketing in Pune: रेमडेसीवीर इंजेक्शन बेकायदेशीर पद्धतीने विकताना पुण्यात एक नर्स आणि तिच्या साथीदाराला अटक; भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल)

याआधी सुद्धा अशा पद्धतीच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षात बहुतांश रिपोर्ट्समधून समोर आले होते की, दारुची ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जाते. मात्र ते विश्वासार्ह नसल्याचे सांगण्यात आले होते. फसवणूकदार खासकरुन मुंबईतील नागरिकांना टार्गेट करत आहेत. अशाच प्रकारची घटना गेल्या महिन्यात नागपूर येथे घडली असून तेथे ही घरपोच दारुची डिलिव्हरी केली जाईल अशी बातमी सर्वत्र पसरली होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी ती बातमी खोटी असल्याची माहिती देत नागरिकांना अशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडू नये असे आवाहन केले होते.