Mumbai News: वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाची अरबी समुद्रात उडी; नौदल, तटरक्षक दलाचे शोध मोहिम सुरु
Sea Link | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai News: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून गुरुवारी पहाटे एका ३३ वर्षीय व्यक्तीने अरबी समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समुद्रात शोध मोहीम सुरु झाला आहे असे एका अधिकाऱ्यांने माहिती दिली आहे.भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.  पहाटे चारच्या सुमारास उडी मारली.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील रहिवासी विनय यादव असलेल्या व्यक्तीने केबल स्टेड पुलावरून समुद्रात उडी मारली. विनय हा व्यवसायाने ड्रायव्हर असून इनोव्हा कारमध्ये आला,त्याने कार पुलावर उभी केली. आणि समुद्रात उडी मारली. स्थानिक पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतला. अग्निशमन दलाने शोध सुरु केला. समुद्रात अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.

विनय याने समुद्रात उडी का मारली याचे कारण अद्यापही समोर आले नाही, ३१ जुलै रोजी एका व्यक्तीने देखील या सीलिंक वरून उडी घातली होती. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला.