मुंबईच्या इन्फिनिटी मॉलमधील गेम झोनमध्ये ट्रॅम्पोलिन स्प्रिंग ब्रेकमुळे एका तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅम्पोलिन अपघाताच्या घटनेत या 19 वर्षीय व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी इन्फिनिटी मॉलच्या गेमिंग झोनच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे की, तरुणाने ट्रॅम्पोलिनवर उडी मारल्यानंतर स्प्रिंग तुटल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तीर्थ बोरा असे या तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथील रहिवासी असलेल्या बोराला कुर्ल्यातील क्रिटिकल केअर एशिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी दुखापतीची पुष्टी केली आणि बांगूर नगर पोलिसांना माहिती दिली. बोरा याच्या तक्रारीनंतर, 19 जुलै रोजी, पोलिसांनी एफआयआर नोंदवला. (हेही वाचा: पालकांनो सावध व्हा! अल्पवयीन मुले वाहन चालवताना पकडल्यास ठोठावण्यात येणार मोठा दंड; अधिसूचना जारी)
मुंबईतल्या मॉलमध्ये अपघात, गेमझोनच्या ट्रॅम्पोलिनची स्प्रिंग तुटल्याने तरुणाचा पाय तुटला pic.twitter.com/qxm7ZCXldg
— News18Lokmat (@News18lokmat) June 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)