महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षातील राज्याचे एकमेव आमदार शरद सोनावणे (Sharaddada Bhimaji Sonavane) आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित आज दुपारी 2 वाजता शिवसेना भवनात या शिवबंधनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याचसोबच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (raj Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बातचीत केल्यानंतर आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे शरद सोनावणे यांनी म्हटले आहे.
नारायण गाव येथे शरद सोनावणे यांनी पत्रकार परिशद आयोजित केली होती. त्यावेळी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. तर शिवसेनेत प्रवेशाबद्दल मला विचारणा करत असल्याने मी हा निर्णय घेत असल्याचे सोनावणे यांनी स्पष्ट केले आहे.(हेही वाचा-राज ठाकरे बारामतीहून येणारी स्क्रिप्ट बोलतात - देवेंद्र फडणवीस यांनी भाजपावरील टीकेला दिलं प्रत्युत्तर)
तसेच जुन्नर येथील विधानसभेची जागा शिवसेनेला मिळाली असल्याने त्याबद्दल शिवसेनेकडे मागणी करु आणि त्यांना पाहिजे ती जागा देण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर झालेल्या बातचीत मध्ये शरद सोनावणे ह्यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या संमतीने आता शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे पत्रकार परिषदेत सोनावणे यांनी जाहीर केले आहे.