मुंबईत (Mumbai) लोकल उशिराने धावत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात असा प्रकार बऱ्याच वेळा पाहायला मिळते. मात्र आज (25 जून) शेकडो प्रवाशांसह चक्क लोकल कारशेडमध्ये गेल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खोळंबा झालेला दिसून आला.
ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाण्याच्या दिशेने निघालेली लोकल चक्क प्रवाशांनी भरलेली असताना सानपाडा कारशेडमध्ये पोहचल्याचा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडालेला होता. परंतु काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल कारशेडच्या दिशेने वळवण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.(बेस्ट प्रवाशांसाठी खुशखबर! भाडे आता 5 रुपये आकारणार)
परंतु लोकलमध्ये असा कोणता बिघाड झाला होता जेणेकरुन ती थेट कारशेडच्या दिशेने वळवली गेली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर प्रवाशांनी या प्रकाराविरुद्ध संताप व्यक्त केला.