बेस्ट प्रवाशांसाठी खुशखबर! भाडे आता 5 रुपये आकारणार
BEST Bus (Photo Credits: PTI)

बेस्टच्या (BEST) प्रवाशांसाठी खुशखबर असून भाडे आता 5 रुपये आकारण्यात येणार असल्याच्या प्रस्तावाला आज मंजूरी देण्यात आली आहे. बेस्टच्या पार पडलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी प्रवाशांकडून किमान अंतरासाठी आठ रुपये भाडे स्विकारले जात होते. मात्र बेस्टच्या भाड्यात कपात करण्यात आली असून आता प्रवाशांकडून किमान अंतरासाठी पाच रुपये स्विकारण्यात येणार आहेत. त्याचसोबत कपात करण्यात आलेल्या भाडे करारात तीन महिन्यात बदल दिसले पाहिजेत अशी अट घालण्यात आली आहे. मात्र बदल न दिसल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही असे पालिकेने स्पष्ट केले होते. तर नवीन प्रस्तावानुसार प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच राहणार आहेत.

(बीड: मोटरमनच्या जागेवर बसून मनोरुग्णाकडून रेल्वे सुरु करण्याचा प्रयत्न, प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला)

बेस्टच्या उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने 600 कोटी रुपये देणार असल्याचे म्हटले आहे. तर सामान्य बससह एसी बसच्या भाड्यात सुद्धा कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसी बसचे आताचे भाडे 15 रुपये असून ते 6 रुपये करण्यात येणार आहे.