Mumbai Trains Update: वाशी - पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर लोकलसेवा विस्कळीत, प्रवासी संतप्त
Mumbai Local Train (Photo Credits: Instagram)

ठाण्याहून (Thane) वाशी (Vashi), पनवेल (Panvel), नेरुळ (Nerul) येथे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर  (Trans Harbour Railway) मार्गावरील लोकलसेवा आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे, त्यामुळे नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात कामाला जाणाऱ्या प्रवाशांची ऐनवेळी पंचाईत झाली आहे. ठाण्याहून सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या सर्वच ट्रेनची वाहतुक ही सुपारी 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे, इतकेच नव्हे तर येणाऱ्या ट्रेन या नियोजित प्लॅटफॉर्म ऐवजी दुसऱ्याचा प्लॅटफॉर्म वरून सोडल्या जात आहेत. याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा लोकलच्या दिरंगाईचे कारण रेल्वे प्रशासनाकडून दिले जात नसल्याने प्रवाशांचा संताप होत आहे.

वास्तविक ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ही नियोजित वेळेत असते, मागील काही दिवसांपूर्वी मुंबईला पावसाने झोडपून काढले असताना, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ठप्प झाल्या होत्या मात्र तेव्हा सुद्धा ट्रान्सहार्बरवरील ट्रेन या नियोजित वेळेत धावत होत्या. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून सातत्याने या मार्गावर लोकलला दिरंगाई होत असल्याचे समजत आहे.

प्रवासी संतप्त

(Photo Credits: M-Indicator)

दरम्यान, अद्याप या लोकलच्या दिरंगाईचे कारण स्पष्ट झालेले नाही, सध्या पावसाने विश्राम घेतला असताना तसेच तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणतेही कारण नसतानाही ट्रेनला उशीर का होत आहे असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.