Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

Mumbai Local Update:  मार्च महिन्यापासून ठप्प असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) आता अखेर सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू होणार आहे. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. त्यामुळे प्रवासासाठी अनेकजण ती सर्वांसाठी कधीपासून सुरू होणार याची प्रतिक्षा होती. पण अखेर 1 फेब्रुवारीपासून ही सर्वांसाठी खुली झाली आहे. पण यामध्ये वेळेचे तीन टप्पे देण्यात आले आहेत. यामध्ये रात्री 9 ते शेवटची लोकल, पहाटे पहिल्या लोकल पासून 7 वाजेपर्यंत आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत मुंबई लोकलने सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार आहे. कोरोनाचं संकट पाहता सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीच्या वेळा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवली जाणार आहे.

राज्य सरकारने आज 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर करताना मुंबईकरांना ही गूड न्यूज दिली आहे. यामध्ये सुरूवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना नंतर नवरात्री 2020 मध्ये महिलांना आणि आता सार्‍यांना मुंबई लोकल खुली केली आहे. (Mumbai Local Updates: आजपासून मुंबईच्या पश्चिम आणि मध्य मार्गावर धावणार अतिरिक्त लोकल ट्रेन्स).

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान मुंबईकरांनी देखील कोरोना संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे.

मुंबई मध्ये हळूहळू कोरोना संकटावर मात करण्यात सरकारला, प्रशासनाला यश आलं आहे. सध्या शहरात दिवासाला 300-400 मध्ये रोज कोविड रूग्ण आढळत आहेत. तर मृत्यूची संख्या देखील 10 पेक्षा कमी असल्याने आता मुंबई लोकल सार्‍यांना खुली करण्याचा निर्णय झाला आहे.

मुंबईमध्ये बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा,मेट्रो मध्ये सर्वसामान्यांना यापूर्वीच प्रवासकरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र यावेळी नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं, मस्क  घालण्याचं बंधन आहे. हे बंधन अजून काही दिवस पुढे असेच कायम ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वैयक्तिक काळजी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात आलं आहे.