मुंबई मध्ये हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour Line Train Services) आज पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेरूळ (Nerul) स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल- सीएसएमटी आणि पनवेल ठाणे मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे. काही काळ सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती पण रेल्वेकडून तांत्रिक दोष दुरूस्त करून पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान सकाळी पाऊस देखील बरसत असल्याने हा तांत्रिक बिघाड दूर करण्यास अधिक वेळ लागला. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या अनेकांचा यामुळे खोळंबा झाला. स्थानकांमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
सानपाडा स्थानकामधील गर्दी
Sanpada station is waiting for train to Thane. Trans-harbour line is a mess today morning. #centralrailways #mumbailocal #navimumbai @drmmumbaicr @CRailwayMumbai @Mumbaikhabar9 pic.twitter.com/43bifNTSF2
— Som Bose (@SoumyajitB1) September 10, 2024
हार्बर सोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही वाहतूक खोळंबली आहे. कल्याण-सीएसएमटी सुमारे 10-12 मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये आज आठवड्याच्या सलग दुसर्या दिवशी रेल्वेची वाहतूक उशिराने आहे.