विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वेच्या (Harbour Railway) वतीनं देण्यात आली आहे. आज रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. प्रत्येक रविवारीचं (Sunday) लोकल रेल्वेकडून हा मेगाब्लॉक घेण्यात येतो पण गेल्या दोन दिवसातील मुंबईसह उपनगरातील पाऊस बघता आजचा मेगाब्लॉक मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक ठरु शकतो. तसेच मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांना मात्र आजच्या मेगाब्लॉक मधून दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway Line) बोरिवली (Borivali) ते कांदिवली (Kandivali) धीम्या मार्गावर आणि बोरिवली ते गोरेगाव (Goregaon) या दरम्यानच्या जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत डाउन (Down) मार्गावरील एक्स्प्रेस, मेल गाड्या अंधेरी (Andheri) ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून चालवण्यात येतील. तर डाउन मार्गावरील जलद लोकल या अंधेरी ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.(हे ही वाचा:- Mumbai Rains: मुंबईच्या दर्याला आज उधाण तर शहरासह उपनगरात पावसाची शक्यता)
RAILWAY MEGABLOCK ON SUNDAY 21.08.2022
HARBOUR & WESTERN LINE
Read more at - https://t.co/S3puSeNubm #railwaymegablock #mumbai #megablocks #mumbaimegablock #mumbailocal #MumbaiNews #Megablock #CentralRailway #WesternRailway #Thane pic.twitter.com/WUUavuSVMp
— m-Indicator - Mumbai Local (@m_indicator) August 20, 2022
चुनाभट्टी/ वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/ चुनाभट्टी या मार्गादरम्यान सकाळी 11.40 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.तरी ट्रान्सहार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नाही.