Mumbai Local Train Mega Block: आज मध्य, हार्बर लोकल मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईकरांनो (Mumbai) आज घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकल रेल्वेने (Local Train) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज लोकल मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल (Signal) यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य (Central Railway) आणि हार्बर (Harbour Line) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाकडून आजचं सुधारीत लोकलचं वेळापत्रक (Time Table) जारी करण्यात आलं आहे. ते तुम्ही प्रवास करण्यापूर्वी एकदा नक्की तपासा. मुंबई लोकल रेल्वेच्या (Mumbai Local Train) आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तरी या मेगाब्लॉकची वेळ, बदलेले मार्ग, मेगाब्लॉक कुठल्या स्टेशन पासून कुठल्या स्टेशन पर्यत असेल याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 

मध्य रेल्वेवरील माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक:-

सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत माटुंगा (Matunga)-ठाणे (Thane) अप (Up) आणि डाऊन (Down) धीम्या (Slow) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (CSMT) सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा (Matunga) आणि ठाणे (Thane) स्थानकांदरम्यान सायन (Sion), कुर्ला (Kurla), घाटकोपर (Ghatkopar), विक्रोळी (Vikroli), भांडुप (Bhandup), मुलुंड (Mulund) आणि ठाणे (Thane) स्थानकांदरम्यान वळवल्या जातील.तर कल्याणहून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल, या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. तसेच सीआरने दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या सर्व लोकल नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा धावतील. (हे ही वाचा:- Women’s Health Campaign: नवरात्रीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका राबवणार Mother Safe, Family Safe आरोग्य अभियान)

 

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक:-

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT) वरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत पनवेलसाठी (Panvel) सुटणारी डाऊन हार्बर (Harbour) मार्गिका आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून (Mumbai) सुटणारी गोरेगाव डाउन (Goregaon Down) हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी (Chunabhatti) आणि वांद्रे (Bandra) डाऊन हार्बर मार्गावर (Down Harbour Line) सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत तर चुनाभट्टी आणि वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर (Up Harbour Line) सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत परिणाम दिसेल. पनवेल येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव (Goregaon) येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.