Women’s Health Campaign: नवरात्रीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका राबवणार Mother Safe, Family Safe आरोग्य अभियान
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Women’s Health Campaign: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आरोग्य विभाग नवरात्रोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये (26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर) महिला आरोग्य अभियान राबवणार आहे. या मोहिमेला 'मदर सेफ, फॅमिली सेफ' (Mother Safe, Family Safe) असे नाव देण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत नवी मुंबई परिसरातील 18 वर्षांवरील महिलांची सर्वसमावेशक तपासणी करण्यात येणार आहे.

या मोहिमेचा उद्देश सर्व महिलांना, मातांना, गरोदर स्त्रिया आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा प्रदान करणे हा आहे. या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाकडून आरोग्य समुपदेशनही केले जाणार आहे. (हेही वाचा - BMC Water Supply: घाटकोपर, विक्रोळीच्या डोंगराळ भागात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी बीएमसीचे प्रयत्न सुरू)

दरम्यान, 'मदर सेफ, फॅमिली सेफ' मोहिमेसाठी आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका घरोघरी जाऊन शिबिरांची माहिती देणार आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या अभियानाचा लाभ घेता येईल. याशिवाय शहरात ठिकठिकाणी सभांचे नियोजन केले जाणार आहे. जनजागृतीसाठी पॅम्प्लेट, बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात येणार आहेत.

आजकाल महिला कामाच्या व्यापात स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेने हे खास अभियाने राबवले आहे. तथापी, 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.