प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

लॉक डाऊन (Lockdown)  काळात बंद असलेल्या मुंबई लोकलच्या (Mumbai Local)  फेऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सुरु झाल्यानंतर आता जवळपास तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा लोकलच्या दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. याबाबत मध्य रेल्वे (Central Railway) जनसपंर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी अधिकृत माहिती दिली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) वर येत्या रविवारी म्हणजेच 5 जुलै रोजी मेगाब्लॉक चे आयोजन करण्यात आले आहे. Mumbai Local Trains: केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांसह 'या' कर्मचाऱ्यांनाही 1 जुलैपासून मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार!

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गवर हा ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. मागील काळात ठरवून दिलेल्या वेळांपेक्षा काहीश्या उशिराने या काळात ट्रेन धावतील. रविवारच्या या मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घ्या.

मेगा ब्लॉक वेळापत्रक

मध्य रेल्वे

विद्याविहार ते ठाणे,

अप आणि डाऊन जलद मार्ग,

सकाळी 10.30 ते दुपारी 3.30

हार्बर रेल्वे-

CSMT -चुनाभट्टी.

अप मार्गावर सकाळी 10.40 ते 3.40

डाऊन मार्गावर सकाळी 11.25 ते 4.25

दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकूण 200 लोकल फेऱ्या होतात. त्यात आणखी 150 फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून मध्य रेल्वेवर 350 लोकल धावणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरही 202 लोकल फेऱ्या होत असून यामध्ये बुधवारपासून 148 फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही उद्यापासून 350 लोकल धावणार आहेत.