Megablock Cancelled | Representational Image | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात अनलॉक 5 (Unlock 5) च्या टप्प्यात मुंबईतील लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी लोकल सेवा (Mumbai Local Services) सुरु असून हळूहळू अन्य नागरिकांसाठीही सुरु करण्यात येणार आहे. त्याचाच एक पुढचा टप्पा म्हणून आजपासून मुंबईत मोनोरेल सुरु होणार असून उद्यापासून मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी सुरु होणार आहे. तर मुंबईत आज मध्य (Central), हार्बर (Harbour) आणि पश्चिम (Western) या तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) ठेवण्यात आला आहे. यामुळे जलद लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी आणि तांत्रिक सुधारणा करण्यासाठी हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कसा कराल रेल्वे प्रवास?

हेदेखील वाचा- Maharashtra Mission Begin Again: मुंबईकरांसाठी आजपासून मोनोरेल सेवेला सुरुवात; उद्यापासून मेट्रो धावणार, पहा काय आहेत नवे नियम

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान सीएसमटीवरून सुटणा-या जलद लोकल माटुंगा ते मुलूंड दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तर अप मार्गावर ठाण्याहून सुटणा-या लोकल मुलूंड ते परेल दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात आल्य आहेत.

पश्चिम रेल्वे

भाईंदर ते वसई रोड दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. 4 तासाच्या या मेगाब्लॉक मध्ये अप आणि डाऊन मार्गावरील सर्व रेल्वे बोरिवली ते वसई रोड दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात आले आहे.

हार्बर रेल्वे

पनवेल-वाशी दरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यात पनवेल ते सीएसएमटी रेल्वे सकाळी 10 ते दुपारी 3.35 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी ते पनवेल रेल्वे सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचा-यांनी त्यानुसार आपला प्रवास आखावा आणि रेल्वेने प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.