Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावर 2 ऑक्टोबरच्या रात्री तर मध्य रेल्वेवर 3 ऑक्टोबरला 'या' वेळेत असणार मेगाब्लॉक
Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

कोविड 19 च्या लॉकडाऊननंतर जशी लोकल हळूहळू पूर्ववत होत आहे तशी आता तिच्या देखभालीची कामं पुन्हा सुरू झाली आहे. या विकेंडला मुंबई मध्ये मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-दिवा मार्गावर, हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल -वाशी मार्गावर ब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते मुंबई सेंट्रल मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉक आज शनिवार, 2 ऑक्टोबर रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. Mumbai Local Update: बोगस ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्यांना बसणार चाप; Universal Travel Pass चं सरकारचं नियोजन.

माहीम ते मुंबई सेंट्रल स्लो लाईनवर जम्बो ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान ट्रॅक, सिग्नल यंत्रणा दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवार, 2 ऑक्टोबर आणि रविवार, 3 ऑक्टोबर, 2021 दरम्यान मध्यरात्री माहिम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान 23.50 ते 04.50 पर्यंत धीम्या मार्गावर अप राइट जम्बो ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे ट्वीट

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते दिवा मार्गावर अप आणि डाऊन धीमा दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 मेगाब्लॉग आहे. या दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप-डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. परिणामी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धावणाऱ्या सर्व लोकल 10 मिनिटं उशिराने धावण्याची शक्यता आहे.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी मार्गावर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर रविवार (3 ऑक्टोबर) सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक आहे. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. पनवेल-ठाणे तसेच नेरुळ-बेलापूर या मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.