मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) मार्गावर देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Mega Block) जाहीर केला जातो. रविवार 28 ऑगस्ट दिवशी मुंबई लोकल वर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र ब्लॉक नसणार आहे. केवळ हार्बर मार्गावर सीएसटीएम- चुनाभट्टी, वांद्रे हार्बर आणि ठाणे-वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बरवर मात्र मेगा ब्लॉक असेल. दरम्यान गणेशोत्सवापूर्वी 28 ऑगस्ट हा नागरिकांना खरेदी करण्यासाठी शेवटचा रविवार आहे.
दरम्यान हार्बर मार्गावर ठाणे- वाशी, नेरूळ अप-डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर 11.10 ते 4.10 या वेळेत ब्लॉक आहे. ठाण्यातून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलसाठी आणि वाशी, नेरुळ, पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील फेऱ्या रद्द केल्या आहेत. हे देखील नक्की वाचा: संतप्त प्रवाशांसमोर मध्य रेल्वेची नरमाईची भूमिका, 10 एसी लोकल सेवा बंद; जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता जनआंदोलनाचा इशारा .
ब्लॉक च्या काळात काही फेर्या रद्द केलेल्या असल्याने पनवेल- कुर्ला (प्लॅटफॉर्म 8) वर स्पेशल फेर्या चालवल्या जाणार आहेत. हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना मेन लाईन वर, वेस्टर्न लाईन वर 10-6 या वेळेत त्याच तिकीटावर प्रवासाची मुभा असणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर कोणतीही सेवा रद्द केलेली नाही.