डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान लोकल मधून खाली पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Mumbai Local (photo credits: Commons.Wikimedia)

मुंबईची (Mumbai) लाईफलाईन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमध्ये नीट उभे राहण्यासुद्धा जागा मिळत नाही. यामुळे लोकलमधून खाली पडल्याच्या दुर्घटना घडून आल्याचे दिसून आले आहे.

तर गेल्या दोन दिवसांपूर्वीच दिवा-कोपर स्थानकादरम्यान एका महिलेचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आज पुन्हा एकदा लोकलमधून खाली पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. शिव कुमार असे तरुणाची ओळख पटली आहे. शिव नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस ऑफिसला जाण्यासाठी डोंबिवली येथून निघाला होता. तर कर्जत येथून सीएसटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्याचा तोल जात लोकलमधून खाली पडला.(कोपर- दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू)

या प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे वल्लभ याच्या नातेवाईकांनी प्रशासनाला धारेवर धरत या दुर्घटांबद्दल संताप व्यक्त केला आहे.