
मध्य रेल्वेच्या (Central Railway) दादर (Dadar) आणि माटुंगा (Matunga) स्थानकाच्या दरम्यान जलद मार्गावर मुंबई- लातूर एक्सप्रेस ट्रेन (Mumbai- Latur Express Train) मध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे नोकरदारांची पंचाईत झाली असून अनेक जण रेल्वेतून रुळावर उतरून चालू लागले आहेत. लातूर कडून मुंबई कडे येणाऱ्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने जलद मार्गावर लोकलचा खोल्मबा झाला आहे, परिणामी जलद मार्गावरील सर्व लोकल या धीम्या मार्गवर वळवण्यात आल्या आहेत, त्यामुळे धीम्या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्याने, इथे सुद्धा लोकलचा वेग मंदावला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल, महामार्गावर वाहनांच्या वेगासाठी बनवले नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
मध्ये रेल्वेवरील वाहतूक विसकळीत झाल्याचा फटका बसलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बिघाड होताच रेल्वेकडून प्रवाशांना काहीच कल्पना देण्यात आली नव्हती त्यामुळे कितीतरी वेळ ट्रेन अशाच उभ्या होत्या, काहीवेळाने रेल्वे कडून लोकलच्या या दिरंगाईबाबत प्रवाशांना सूचित करण्यात आले मात्र त्यावेळी ऑफिसला जाण्यास उशीर होत असल्याने अनेकांनी ट्रेन मध्ये उतरून जवळचे स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भर रेल्वे रुळावर प्रवासी चालताना दिसत होते.
दरम्यान, मुंबई- लातूर एक्सप्रेस मध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी प्रयत्नात आहेत. मात्र यासाठी लागणाऱ्या वेळात कामावर जाणाऱ्या चाकरमानी मुंबईकरांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.