मुंबई: उत्तर प्रदेशाला जाणाऱ्या 2 ट्रेन रद्द झाल्याने कांदिवली येथील महावीर नगर मध्ये स्थलांतरीत मजूरांची तोबा गर्दी; पाहा फोटोज
Large number of migrant labourers have gathered at the grounds in Kandivali (Photo Credits: ANI)

बोरीवली (Borivali) हून उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) जाणाऱ्या 3 पैकी 2 ट्रेन्स रद्द झाल्याने कांदवली (Kandivali) येथे स्थलांतरीत मजूरांनी (Migrant Labourers) एकच गर्दी केली आहे. कांदवली येथील महावीर नगर (Mahavir Nagar) येथे मजूरांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान मजूर घरी जाण्याची मागणी करत आहेत. तर पोलिस गर्दी पांगवण्याच्या प्रयत्नात आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पात मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरु करण्यात आल्या. त्या ट्रेन्समधून अनेक मजूरांना आपल्या राज्यात सुखरुप पाठवण्यात आले आहे. दरम्यान श्रमिक ट्रेन रद्द झाल्याची ही पहिलीच घटना समोर येत आहे.

यापूर्वी लॉकडाऊनमध्ये वांद्रे स्थानकात घरी जाण्याच्या मागणीसाठी स्थलांतरीत मजूर एकत्रित जमले होते. मात्र त्यावेळेस ट्रेन सुरु झाल्याची चुकीची माहिती त्यांना देण्यात आली होती. परंतु, आता मजूरांच्या घरवापसीसाठी ट्रेन्स सुरु झाल्या आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशाला जाणाऱ्या 2 ट्रेन्स रद्द झाल्याने गोंधळ उडाला आहे. (देशात 1 जून पासून सुरु होणाऱ्या 200 प्रवासी ट्रेन्सचे तिकीट कसे बुक कराल? irctc.co.in वरुन तिकीट बुक करण्यासाठी स्टेप्स)

ANI Tweet:

महाराष्ट्रात अधिक नागरिक कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 39297 वर पोहचला असून यात 1,390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 27589 रुग्णांवर उपचार सुरु असून 10318 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. देशासह राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु असून यात अनेक बाबतीत अटी, शर्थींच्या आधारे सवलती देण्यात आल्या आहेत.