मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड येथील मेट्रोच्या मशीन बिघाड झाल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मेट्रोच्या मशीन अदनानी कंपनीच्या येथे तुटल्याने मुंबई पोलिसांनी याबाबत ट्वीट करत अधिक माहिती दिली आहे. त्यामुळे गांधीनगर आणि बंदूमाधव चौक येथून वाहतूकीच्या मार्गात बदल केला आहे. त्यामुळे सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या मार्गावरुन वाहतूकीचा वेग मंदावला थोड्याच अंतरावर जाण्यासाठी सुद्धा एक ते दीड तास लागत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
तसेच मध्यरात्री मिलिंदनगर जवळ डंपर मेट्रोच्या बॅरिकेटिंमध्ये घुसल्याने अपघात झाल्याची घटना घडली. त्यामुळे विक्रोळी येथून जोगेश्वरीला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे विक्रोळी येथून जोगेश्वरीला जाणाऱ्या मार्गावर वाहतुक कोंडी दिसून आली. तर मुंबईत सध्या मेट्रोच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्याचा प्रचंड त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.(महाराष्ट्र : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिरा रोड, वडाळा- सीएसएमटी, कल्याण-तळोजा या 3 मेट्रो प्रकल्पांना मान्यता)
Mumbai Police Tweet:
All commuter please note -
Traffic is slow-moving due to Metro machine breakdown at Adani Company( Westbound), JVLR. Hence traffic is diverted from - Gandhinagar and Bindumadhav Chowk. Please use SCLR for Western Suburban.
— Mumbai Police (@MumbaiPolice) October 23, 2019
तर काही दिवसांपूर्वीच पवई आणि आरे दरम्यान कन्स्ट्रक्शनचे काम सुरु असताना भलामोठा दगड कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या अन्य एका कामगाराला सुद्धा दुखापत झाली असल्याचे मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले होते.