Mumbai Jeweller's Ring Sets World Record: भारतातील एका ज्वेलरी कंपनीने 50,907 हिऱ्यांसह अंगठीत जडलेल्या सर्वाधिक हिऱ्यांसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) किताब मिळवला आहे. इतकेच नाही तर त्यांनी संपूर्णपणे पुनर्उद्देशीय साहित्य वापरून हिऱ्यांचा तुकडा तयार केला. GWR ने ट्विटरवर या अमूल्य सुंदर कलाकृतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबईतील H.K. Designs अँड हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने (Hari Krishna Exports Pvt. Ltd) अंगठीमध्ये सर्वाधिक हिरे सेट करण्याचा' जागतिक विक्रम केला आहे, ज्यामध्ये 50,000 हून अधिक हिरे आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) नुसार या वर्षी 11 मार्च रोजी ही आकर्षक कामगिरी करण्यात आली आहे. या अंगठीला युटिएरिया (Eutierria) असं नाव देण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ 'निसर्गाशी एकरूप होणे' आहे आणि त्यावर फुलपाखरू असलेले सूर्यफूल आहे. H.K Designs नुसार, तयार झालेल्या अंगठीचे वजन 460.55 ग्रॅम आहे. तसेच या अंगठीची किंमत 6.4 कोटी रुपये आहे. (हेही वाचा - World's Oldest Wine: जगातील सर्वात जुनी वाइन; तब्बल 1650 वर्षांनंतरही पिण्यासाठी असू शकते सुरक्षित (See Photos))
GWR च्या ब्लॉगनुसार, अंगठीची किंमत 785,645 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 6,42,23,061.19 रुपये इतकी आहे. ही अनोखी रिंग तयार करण्यासाठी सुमारे नऊ महिने लागले. या अंगठीवर सूर्यफुल असून त्यावर एक फुलपाखरू बसलेलं आहे.
एचके ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक हसू ढोलकिया यांनी सांगितले की, स्वप्ने 'खरी' होत नाहीत, ती 'खरी करावी लागतात'. या स्वप्नावर विश्वास ठेऊन त्यावर कृती केल्याने स्वप्न पूर्ण होतात. चिकाटीने ते दृष्टीक्षेपात एक ध्येय बनते. संयम आणि वेळ एकत्र केल्यास स्वप्न सत्यात उतरते. एक दुर्मिळ कलाकृती घडवण्याचे आमचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास स्वतःमध्ये तयार केला. मला विश्वास आहे की ही अंगठी तयार करून आम्ही हे स्वप्न पूर्ण केलं आहे.
New record: Most diamonds set in one ring - 50,907 achieved by H.K. Designs and Hari Krishna Exports Pvt. Ltd. (India)
Incredibly, the ring is made entirely out of recycled materials. Recycled gold was mixed with re-purposed diamonds to create this magnificent piece 💍 pic.twitter.com/xCiT9gEilH
— Guinness World Records (@GWR) April 28, 2023
सध्या सोशल मीडियावर या अंगठीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटीझन्स या कलाकृतीचं कौतुक करत असून या व्हिडिओला लाईक करत आहेत. HK डिझाईन आणि हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने हा विक्रम करून भारतातील सर्व ज्वेलर्संना मागे टाकले आहे. यापूर्वी SWA डायमंड्सने मशरूमच्या आकाराची अंगठी 24,679 हिऱ्यांपासून बनवली होती.