मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेज कर्मचार्‍यांचे पुन्हा आंदोलन सुरू
Jet Airways employees (Photo Credits: Twitter)

आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या जेट एअरवेजला (Jet Airways) वाचवण्याचे प्रयत्न विविध स्तरावर सुरू आहेत. मात्र आज (8 मे) व्यावसायिक व जेट एअरवेज कंपनीचे समभाग बाळगणाऱ्या काही गुंतवणूकदारांनी जेटच्या व्यवस्थापनाची सूत्रे स्वीकारण्याची तयारी दाखवली होती मात्र स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank Of India) ती नाकारली आहे. यानंतर आज जेट एअरवेजचे कर्मचारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) जमले आणि निषेध करायला पुन्हा सुरूवात केली आहे. पगारासाठी Jet च्या कर्मचाऱ्यांनी घेतली अरुण जेटली यांची भेट; कंपनीला तारण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज उत्सुक?

ANI Tweet

17 एप्रिल 2019 दिवशी जेट एअरवेजचे शेवटचे विमान उडाले. त्यानंतर पुढे अनिश्चित काळासाठी जेट एअरवेज बंद पडल्याने आता जेटच्या अनेक कर्मचार्‍यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मागील दोन महिन्यांपासून जेट एअरवेजचे कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेमध्ये आहेत.