कुलाबा हा दक्षिण मुंबई मधील महत्त्वाच्या आणि हाय प्रोफाईल भागांपैकी एक आहे. येथे अनेक पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे देश-विदेशातील येणारे पर्यटक या भागात मोठ्या प्रमाणात आढळतात. कुलाबा येथे कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत असायला हवी तसेच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कुलाबा नीट अँड क्लीन असायला हवा ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. कुलाबा मध्ये सर्वात मोठा प्रश्न हा अनाधिकृत पार्किंगचा आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरील वाहन इकडे पार्क होतात त्यासाठी महानगरपालिका व ट्राफिक पोलीस यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कुलाबा येथील फुटपाथवर ठाण मांडून बसलेले भिकारी, अनाधिकृत हॉकर्स यांच्यामुळे कुलाबा मधील सर्व फूटपाथ गच्च भरलेले आहेत. परिणामी स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना जाण्या-येण्याचा खूप कसरत करावी लागते व रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.
महानगरपालिका व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे कुलाबा येथील सोशल वर्कर सुभाष मोटवाणी, परवेज कूपर यांनी क्लीन कुलाबा म्हणून एक स्थानिक नागरिकांचा ग्रुप तयार केला आहे. क्लीन कुलाबा या असोसिएशन तर्फे कुलाबा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांच्यासोबत क्लीन कुलाबा असोसिएशन मध्ये काम करणारे सर्व उच्च शिक्षित लोक या असोसिएशन सोबत जोडले आहेत. वर्षानुवर्ष कुलाबा मध्ये हे लोक राहत आहेत त्यापैकी अनेक लोकांवर मुंबई पोर्ट ट्रस्ट (BPT) कडून त्यांच्यावर अन्याय होत आहे. कुलाबा येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मोठ्या प्रमाणात लँड बँक आहेत.
कुलाबा येथील अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी क्लीन कुलाबा असोसिएशनचे शिष्टमंडळ परवेज कूपर, सुभाष मोटवाणी, अनिल महाजन यांच्या नेतृत्वात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई पोलीस कमिशनर हेमंत नागराले यांची भेट घेण्यात येणार आहे. असे सुभाष मोटवानी यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.