Monsoon | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. तसेच उद्या सुद्धा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडी यांनी व्यक्त केला आहे. परंतु पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना आपल्या घरी पोहचायचे असा प्रश्न पडला आहे. याच कारणास्तव आता मुंबई महापालिकेने शहरात पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी सीएसटी आणि कुर्ला मधील पालिकेच्या शाळेत त्यांची राहण्याची सोय करुन दिली आहे. त्याचसोबत असुरक्षित ठिकाणच्या नागरिकांना हलवण्यात येणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे दादर मधील हिंदमाता हा सखल परिसर असून तेथे वॉटर लॉगिंग झाले आहे. परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने दरवर्षी नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतो. परंतु महापालिकेने प्रामुख्याने वॉटर लॉगिंग होईल अशा ठिकाणी पंप लावले आहेत.त्याचसोबत रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळ पाण्याखाली गेल्याचे दिसून आले आहे.(Mumbai Monsoon Updates: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी अतिअत्यावश्यक काराणासाठी घराबाहेर पडा; अन्यथा घरीच थांबण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन)

दरम्यान, मुंबईतील कुलाबा येथे 22.9 mm आणि सांताक्रुझ येथे 8.8mm पावसाची सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंतची ही नोंद करण्यात आली आहे. तर किनारपट्टीवरुन 70kmph च्या वेगाने वारे वाहत असून पुढील 3-4 तास ही परिस्थिती अशीच राहणार असल्याची माहिती आयएमडी यांनी दिली आहे.