Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

भरघाव कारने बसला जोरदार धडक दिल्याने मुंबई (Mumbai) येथील एका हॉटेल व्यवसायिकाच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मरिन ड्राईव्ह (Marine Drive) येथे मंगळवारी रात्री घडली. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसेच सीसीटीव्ही तपासत असून कार नेमके कोण चालवत होते? याची माहिती घेतली जात आहे. आर्यमन राजेश नागपाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आर्यमन हा मुंबईतील प्रेसिडेंट हॉटेलच्या मालकांचा मुलगा आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आर्यमन राजेश नागपाल आणि शौर्यसिंग शरद जैन हे दोघेही रात्री चौपाटीच्या दिशेने चालले होते. यावेळी उड्डाणपुलापासून 100 मीटर अंतरावर कार बसला जाऊन धडकली. अपघातात आर्यमन आणि शौर्यसिंग दोघेही गंभीर झाले होते. दोघांनाही हरिकिशनदास रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी आर्यमन याला मृत घोषीत केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या शोर्यसिंग शरद जैन यांच्यावर उपचार सुरु असल्याचेही पोलिसांना सांगितले आहे. आर्यमन नागपाल याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांवर दुख: चे डोंगर कोसळले आहे. हे देखील वाचा- Coronavirus च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तुरुंगामधील 50 टक्के कैद्यांना तात्पुरते सोडण्याचा निर्णय

तसेच आज सकाळी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी ऍड. दिग्विजय त्रिवेदी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर मेंढवन खिंडीत हा अपघात झाला आहे. या अपघातात ऍड. दिग्विजय त्रिवेदी यांचा मृत्यू झाला आहे.