
मुंबई (Mumbai) शहर एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा हादरुन गेले आहे. तीन पुरुषांनी एका एका 42 वर्षीय महिलेल्या घरात घुसून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार (Mumbai Gangrape) केला आहे. सदर घटना कुर्ला (Kurla) येथे बुधवारी पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे आरोपी आणि पीडित महिला एकाच वस्तीत राहतात. तिन्ही आरोपींनी पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केले. तिला धारधार शस्त्राचा धाक दाखवून तिच्या गुप्तांगावर सिगारेटचे (Cigarettes)चटकेही दिले. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि अनैसर्गिक सेक्सही केला. त्यांनी सिगारेटच्या सहाय्याने तिच्या प्रायव्हेट पार्टवर चटके दिले. तसेच, तिच्या छातीवर आणि दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार केले. एका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला. तसेच पीडिता पोलिसांगडे गेली तर हा व्हिडिओ प्रसारीत करुन तिची बदनामी करण्याची धमकी दिली. (हेही वाचा, Thane Gangrape Case: ठाण्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये मर्चंट नेव्हीचा कर्मचारी आणि हिस्ट्रीशीटरचा समावेश)
एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले, आरोपींनीपीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेट जळली आणि घटनेदरम्यान तिचे केसही ओढले. आरोपींनी पीडितेसोबत धक्कादायक प्रकार केल्यानंतर पीडितेने तिच्यावर बेतलेला प्रसंग शेजाऱ्यांना सांगितला. शेजाऱ्याच्या माध्यमातून पीडिता एका एनजीओच्या संपर्कात आली. त्यानंतर पीडितेने एनजीओच्या मदतीनेच कुर्ला पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आणि तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार), 376डी (सामूहिक बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 324 (स्वेच्छेने धोकादायक शस्त्राने दुखापत करणे) आणि इतर गुन्ह्याखाली आरोप ठेवण्यात आले असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.