
Mumbai: मुंबईत राहणाऱ्या एका एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीने (45 वर्षे) आपल्या 14 वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना बॉम्बे हॉस्पिटल येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना गेल्या आठवड्यातील असून सोमवारी आझाद मैदान येथील पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.(Jalgaon: तरुणीचा दबाव, तरुणाची आत्महत्या, लग्नासाठी तगादा लावल्याने टोकाचे पाऊल)
टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, पीडितेने जेव्हा तिच्यासोबत घडलेली घटना शेजारी राहणाऱ्या महिलेला सांगितली असता त्याचा खुलासा झाला. त्यानंतर महिलेने पीडितेला आझाद मैदान पोलिसांकडे घेऊन जात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडितेची आई हिला सुद्धा एचआयव्ही झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.(Crime: पिंपरी चिंचवडमध्ये स्वयंपाकाला उशीर झाल्याने पत्नीवर ओतलं डिझेल, आरोपी पती अटकेत)
रिपोर्ट्सनुसार, पोलिसांकडून एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या वडिलांमुळे सावत्र मुलीला सुद्धा त्याची लागण झालीय का याचा तपास करत आहेत. आरोपीच्या विरोधात आयपीसी कलमांसह पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.